।।राधारूपी।।

।।राधारूपी।।
राधारुपी तिच्या मनाचा एक वेगळाच कृष्ण होता,
तिने कुणावर प्रेम करावं हा तिचा प्रश्न होता।

तिच्याकडे शारदेची बुद्धी, रुप्याची सुंदरता आणि कुबेराची श्रीमंती होती,
माझ्याकडे बुद्धी सोडता इतर सर्व गोष्टींची नापसंती होती,
मग का गुंतवावे तिने तिचे मन माझ्या
हा तिचा परखडतेचा बाण तीक्ष्ण होता
तिने कुणावर प्रेम करावं हा तिचा प्रश्न होता।

राज-महालातली ती राजकन्या,
माझा राम मात्र वनवासी होता, सागरा इतकी अथांग होती ती
अन् माझा किनाराच लहान होता।
राधारुपी तिच्या मनाचा एक वेगळाच कृष्ण होता
तिने कुणावर प्रेम करावं हा तिचा प्रश्न होता ।

Comments