राम...!!!


राम म्हणजे काय?..... दशरथाचा मुलगा,अयोध्येचा राजा, सितेचा पति ,हनुमंताची ख्याति.....का संकल्पाचा धनी, त्याग ज्याच्या मनी,धैर्याची शिदोरी,का संघर्षाची आजोळी.....
राम शिलं ला रोकड़ा,राम वचनाला जागला, रामा ने धर्म दाखाविला, पितृआज्ञेसाठी संसार वनात नेला. ठोकरला राजपाठ,ऐशोराम ,अधिकार....राम कुपेक्षिताचा झाला,राम वंचिताचा झाला,दगड़ाची अहिल्या राम मुक्त कराया गेला.राम केवटाचा होतो, राम शबरीचा हाेतो,राम सुग्रीवाची मैत्री निभवाया जातो.राम राजा हे वनाचा,सकल जनाचा,राम जटायू चा ऋणी, लावी खारू ही कारणी,राम सागर ओलांडी,राम लंकेश हारवी,राम अवतार देवाचा ,पन नाही अहंकार मनी.....
राम जानावा हृदयी राम जगावा या जनी,राम नाही हापापलेला आपल्यावानी .मुकुट डोक्याचा तो काढूनही देतो ,स्मितहास्य मुखाचे तरी कुठे ढळू देतो.राम आपलाच रे सखा नशिबाला चुकलेला,पण नाही सोडला धर्म म्हणूनच जिंकलेला. राम सय्यम सय्यम,राम साहस साहस,राम आधार सकला,राम उदार उदार......
राम तुझ्यात मझ्यात,राम सुखात दुखा:त,
राम पैलतिर नदीचा आणि राम नाव चालावित....
_सौरव महाजन 
(Contact: 8378862867)

Comments

  1. उत्तम लेख.....✨✨💫💫

    ReplyDelete
  2. उत्तम मांडणी आणि लेखन 👍🏻

    ReplyDelete

Post a Comment