कृष्णा....!


कृष्णा न अर्जुनाला गीता सांगितली, मग कृष्णालाच प्रश्न पडले तर कोण उत्तर देईल...कृष्णा स्वतः किंवा कुणी नाही....

कृष्ण म्हणजे अशी परिस्थिती किंवा मनुष्य ज्याच्यावर कुणी नसतं. कृष्ण जो सर्वाना सर्व काही सांगु शकतो पण त्याच्या पायावर येणारा बाण रोखून तो थांबवु शकत नाही स्वतःच्या प्रारब्धाला! कृष्ण म्हणजे कर्म, असं कर्म ज्याला इच्छा असली तरी मिळणार नसतं फळ कधीच, कृष्ण म्हणजे फक्त देणे, परत किती आणि कधी येईल हे समजुन न घेता, कृष्ण म्हणजे प्रेम, ज्याला वाटता येतं पण मिळत नाही हवं तसं पुन्हा, कृष्ण म्हणजे दिशा, ज्याला टाकून द्यावं लागतं सगळं कुणी बोलावलं तर लगेच जाण्यासाठी, कृष्ण म्हणजे आस्था जी कुब्जा हि पाहू शकते आणि कबीरही , कृष्ण म्हणजे भावना जी हलू शकत नाही स्मितहास्य सोडून कुठेही, कृष्ण म्हणजे काळ जो माफ करतो फक्त काही गुन्हे, कृष्ण म्हणजे समर्पण आणि भक्ती जी वेड लावते वेणूलाही , कृष्ण म्हणजे उत्तर ज्याला नाही विचारता येत कुणाला प्रश्न , कृष्ण म्हणजे तुम्ही आम्ही आणि सगळेच कधीतरी, कुठेतरी, कुणासाठी तरी, कृष्ण म्हणजे झाड ज्याला बांधलं जातं उंच दोरीवर ज्यावर नसतं कुणी हात देणारं .....कृष्ण म्हणजे अपेक्षा जी पूर्ण होऊनही अपूर्ण आणि अपूर्ण असुनही पूर्ण , कृष्ण म्हणजे श्वास जो वाहतो पण कळत नाही, कृष्णाला कोण सांगतं गीता ? तो स्वतः किंवा कुणी नाही...


Comments