भिजलेली एक सांज आली
आभाळाची गर्दी दाट झालीछेडण्या एक मंद झुळूक आली
रिमझिम पावसाला सुरूवात झाली
सोबत आठवणींचे पसारे आले
थंड हवेने अंग शहारले
पाहता पाहता गर्जना झाली
नभावर विजेची नक्षी उमटली
भयभीत झाले अंगणातले झाड
थराराले माळावरचे उंच माड
पक्षी ही पार गारठून गेले
पुन्हा या पाहुण्याने मज हैराण केले
आठवणी जुन्याच या पावसाच्या
आज आठवणींचा ही पाऊस झाला
कुठे मी एकटाच,अन् तू दूर दूर प्रिये
नकळत या थेंबांत तुझा आभास झाला
हा तोच तुला भेटवणारा
तुझ्यात मला गुंतवनारा
विसरलेली तू आणि
तुझीच पुन्हा आठवण देणारा
भिजलेली तू अन् निशब्द मी
जिंकलेली तू अन् तुझ्यात हरलेलो मी
आता दूर तू....अन् एकटा पाऊसात मी......
..सौरव महाजन
....Saurav mahajan
Contact :8378862867
❤️❤️❣️
ReplyDelete