👑 एक रात्र स्वप्नाची 👑
थकलेला देह अंथुराणावर पडला
सहज मिटली पापण्यांची द्वारे
अन शांत हृदयास या मंद श्वाशास
का जागे करती मज भावनांचे किनारे
कधी अलगद हास्य पसरते मुखावर
कधी भीतीने येति अंगावर शहारे
ना सोबती कुणाची या पटलावर मला
ना हाकेला कुणाचा 'ओ'कार मिळे
विचारांचे वादळ कंपून टाकते मज
कसा विक्षिप्त खेल हा समोर चाले
निघण्याची दिसेना वाट एक मला
क्षणभरात मृत्यूचा जणू साक्षात्कार घडे
जागा झालो भयभीत मी रात्री
पण समोर निवांत शांतता होती
स्वप्नाच्या त्या दुनियेची इथे
कुणाला साधी कल्पना ही नव्हती
खेल मनाचा संपून गेला कधीच
आठवणींचीही पाटी पुसली होती
कोण जाणे कोणास ठाऊक
ही रात्र घेऊन स्वप्ननगरीची सफारी
का मला भेटण्यास आली होती
का मला भेटण्यास आली होती...
थकलेला देह अंथुराणावर पडला
सहज मिटली पापण्यांची द्वारे
अन शांत हृदयास या मंद श्वाशास
का जागे करती मज भावनांचे किनारे
कधी अलगद हास्य पसरते मुखावर
कधी भीतीने येति अंगावर शहारे
ना सोबती कुणाची या पटलावर मला
ना हाकेला कुणाचा 'ओ'कार मिळे
विचारांचे वादळ कंपून टाकते मज
कसा विक्षिप्त खेल हा समोर चाले
निघण्याची दिसेना वाट एक मला
क्षणभरात मृत्यूचा जणू साक्षात्कार घडे
जागा झालो भयभीत मी रात्री
पण समोर निवांत शांतता होती
स्वप्नाच्या त्या दुनियेची इथे
कुणाला साधी कल्पना ही नव्हती
खेल मनाचा संपून गेला कधीच
आठवणींचीही पाटी पुसली होती
कोण जाणे कोणास ठाऊक
ही रात्र घेऊन स्वप्ननगरीची सफारी
का मला भेटण्यास आली होती
का मला भेटण्यास आली होती...
....सौरव महाजन
....saurav mahajan
Contact :8378862867
Comments
Post a Comment